*देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत *

मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील चार नेत्यांसह अचानक दिल्लीला गेले आहेत. राजस्थानमध्ये राजकीय नाट्य घडत असतानाच फडणवीस दिल्लीत गेल्याने तर्कवितर्काना उधाण आल आहे. महाराष्ट्रातही सत्तांतर होण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीवारीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, मदन भोसले आणि आमदार जयकुमार गोरे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मात्र दिल्लीत गेलेले नाहीत. तब्येत ठीक नसल्याने लोणीतच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. साखर कारखान्यांचे प्रश्न आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत गेल्याचं सांगण्यात येतं. दिल्लीवारीत ते भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं सत्रांनी सांगितलं.